Pune : वेळू फाटा येथील खेडशिवापूर कमानीजवळील गोडावूनला भीषण आग

एमपीसी न्यूज – सातारा रोडवर वेळू गावात स्पंज गादी कारखाना आणि भंगारच्या गोडावूनला आज सकाळी अकरा वाजता भीषण आग लागली आहे. मात्र, आगीचे कारण समजू शकले नाही, पुण्यावरूनही अग्निशमनच्या गाड्या रवाना झाल्या आहेत.

वेळू फाटा खेडशिवापूर कमानीजवळील गोडावूनला आग लागली असून पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या चार गाड्या आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.