Pimpri: पुन्हा गौतम चाबुकस्वार आणि अण्णा बनसोडे यांच्यात सामना!

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा शिवसेना-भाजप महायुतीचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यात लढत होणार आहे. तर, भाजपचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि भाजप-आरपीआय युतीच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये चाबुकस्वार यांचा थोड्या मतांनी विजय झाला होता. या निवडणुकीत पुन्हा चाबुकस्वार आणि बनसोडे यांच्यात लढत होणार आहे. तर, भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी माघार घेतली आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे चाबुकस्वार आणि बनसोडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिंपरी विधानसभा 2009 मध्ये अस्तित्वात आला. मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान बनसोडे यांना मिळाला होता. तर, दुसरे आमदार चाबुकस्वार झाले. आता तिसरा आमदार कोण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘हे’ आहेत निवडणुकीच्या रिंगणात!
शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अण्णा बनसोडे, भापसे पार्टीचे दिपक ताटे, राष्ट्रवादी रिपल्बिकन पार्टीचे डॉ. राजेश नागोसे, बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद हेरोडे, बहुजन समाज पार्टीचे धनराज गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण गायकवाड, भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदीप कांबळे, भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, अॅड. मुकुंदा ओव्हाळ, अजय लोंढे, दिपक जगताप, चंद्रकांत माने, नरेश लोट, हेमंत मोरे, युवराज दाखले, अजय गायकवाड असे 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

‘यांनी’ घेतली माघार
भाजपचे अमित गोरखे, भीमा बोबडे, चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रवादीचे राजू बनसोडे, सुलक्षणा धर, शेखर ओव्हाळ, काँग्रेसचे सुंदर कांबळे, मनोज कांबळे, उत्तम हिरवे, संदीपान झोंबाडे, गौरीशंकर झोंबाडे, सतिश भवाळ, विजय रंदील अशी 13 जणांनी माघार घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.