Pune : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात (Pune) आलेल्या लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा  व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. तिच्याच नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते काढून हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. तर, व्हॉट्सअपवर देखील तो व्हायरल करण्यात आला आहे.

नृत्य करताना घातलेल्या कपड्यावरून तसेच नृत्यात अश्लील हावभाव करताना गौतमी पाटील मध्यंतरी ट्रोल झाली होती. यानंतर ती कायमच चर्चेत राहत असल्याचे दिसत आहे. दरम्यान गौतमी पाटीलची बदनामी करण्यासाठी हा प्रकार केल्याचे म्हटले जाते.

पोलिसांनी याप्रकरणी आता गुन्हा नोंद केला आहे –

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात 26 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनोळखी खाते धारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी डान्सर असून, ती लोहगाव परिसरात राहण्यास आहे. तरूणी गौतमी पाटील यांच्या सहकारी आहेत. गौतमी पाटील प्रस्तुत ‘नुसताच राडा’ या डिजे ऑक्रेस्ट्रामध्ये तीही डान्स करते.

दरम्यान, रात्री तक्रारदार तरुणीच्या इन्स्टा आयडीवर गौतमी पाटीलच्या फेक आयडीवरून मॅसेज आला. त्यात गौतमीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, तो थांबवा असा मॅसेज आला. त्यानंतर त्यांनी लगेच संबंधित व्हिडीओ पाहिला असता त्यात गौतमी पाटील (Pune) यांचा कपडे काढतानाचा व्हिडीओ गुपचूप काढून तो अपलोड केल्याचे दिसून आले.

त्यानंतर एका मित्राने देखील याच व्हिड़ीओबाबत तिला माहिती दिली. तसेच, तो व्हिडीओ तिला पाठविला. त्यानंतर तरुणीने गौतमी हिच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यावेळी बनावट खाते काढून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचे दिसून आले.

Kasba Election : पैशाचे पाकीट घेण्यास नकार दिल्याने मारहाण; भाजपच्या माजी नगरसेवकासह 20 जणांवर गुन्हे

त्यानंतर संबंधिताने तरुणीला सतत मॅसेजकरून गौतमी पाटील हिला व्हिडीओ कॉल करण्यास सांगा. अन्यथा सर्वांचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. तो देखील व्हायरल करेल अशी धमकी दिली. या तरुणीला वेगवेगळ्या तीन फेक खात्यावरून मॅसेज करण्यात आल्याचे समोर आले.

त्यांनी लागलीच विमानतळ पोलिसांकडे धाव घेतली. घटनेची माहिती देऊन तक्रार दिली. पोलिसांनी या खाते धारकांवर गुन्हा नोंद केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.