Pune: काही वर्षांपूर्वी पुण्यातील ‘या’ गुंडाचा झाला होता एन्काऊंटर

Pune: A few years ago, there was an encounter between goons in Pune तळेगाव दाभाडे परिसरात त्याच्या नावाची दहशत होती. अनेक गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. पण तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता.

एमपीसी न्यूज- उत्तर प्रदेश पोलिसांनी आज (दि.10) पहाटे कुख्यात गुंड विकास दुबे याला चकमकीत ठार केले. आजपासून चार वर्षांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी ही अशाच एका चकमकीत श्याम दाभाडे या गुंडाला ठार केलं होतं. चाकण जवळच्या अंबू डोंगरावर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे उर्फ तांबोळी मारले गेले होते.

तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खून प्रकरणात श्याम दाभाडे हा मुख्य आरोपी होता. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खुनातील ही तो आरोपी होता. त्याच्यावर खून, खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते.

तळेगाव दाभाडे परिसरात त्याच्या नावाची दहशत होती. अनेक गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. पण तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता.

दरम्यान 30 नोव्हेंबर 2016 रोजी तो आणि त्याचा साथीदार खेड तालुक्यातील अंबू डोंगरावर वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या एका पथकाने पहाटेपासूनच त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

यावेळी पोलिसांना अंबू डोंगरावरील पवनचक्कीजवळ एक तंबू दिसला. या तंबूत असणाऱ्या दाभाडे आणि शिंदे यांना पोलिसांनी शरण येण्यास सांगितलं. परंतु, त्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे दोघेही मारले गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.