Vikas Dube Encounter: 8 पोलीस शहीद, 171 तासांचा थरार अन् विकास दुबेचा एन्काऊंटर

Vikas Dube Encounter: 171 hours of thrill and vikas dube encounter सुरुवातीला त्याने पोलिसांची वाहनं अडवण्यासाठी रस्त्यात जेसीबी उभा केला. जेव्हा पोलीस वाहनातून बाहेर पडले तेव्हा 10 ते 15 गुंडांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

एमपीसी न्यूज- दिवस: शुक्रवार, तारीख: 3 जुलै, स्थळ बिकरु गाव, चौबेपुर, जिल्हा: कानपूर, उत्तरप्रदेश

याच गावात हे मोठं हत्याकांड घडलं होतं. उत्तर प्रदेश पोलिसांची वाहनं हळूहळू बिकरु गावाच्या दिशेनं जात होते. कारण याच गावात लपला होता डॉन विकास दुबे.. पण विकास दुबेला पोलीस पकडण्यासाठी येणार असल्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यानंतर त्याने पोलिसांनाच मारण्याची योजना आखली. सुरुवातीला त्याने पोलिसांची वाहनं अडवण्यासाठी रस्त्यात जेसीबी उभा केला. जेव्हा पोलीस वाहनातून बाहेर पडले तेव्हा 10 ते 15 गुंडांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

पोलिसांनीही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. पण गुंड उंचावरून गोळीबार करत असल्यामुळे त्याचा त्यांना फायदा झाला नाही आणि या चकमकीत आठ पोलीस शहीद झाले. ही घटना घडल्यापासून विकास दुबे आणि त्याचे साथीदार फरार होते. उत्तर प्रदेश पोलिस त्यांच्या मागावर होते.

यामधल्या दिवसात पोलिसांनी त्याच्या काही साथीदारांचा खात्माही पोलिसांनी केला. गुरुवारी मध्य प्रदेशातील महाकाल या मंदिरातून विकास दुबेला अटक करण्यात आली होती.

त्यानंतर आज पहाटे त्याला उत्तरप्रदेश पोलिसांचे स्पेशल टास्क फोर्सचे पथक त्याला मध्यप्रदेशातील उज्जैन येथून कानपूरला घेऊन जात होते. ज्या वाहनात विकास दुबे बसला होता त्या गाडीला अपघात झाला आणि याच संधीचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकास दुबेला पोलिसांनी चकमकीत ठार केलं. आठ दिवसांत पोलिसांनी विकास दुबेचा खात्मा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.