Pune : किरकोळ वादातून मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार; मुलीचा मृत्यू तर, आई गंभीर

एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून एकाने मुलीसह तिच्या आईवर चाकूने वार केल्याची घटना आज घडली आहे. यात मुलीचा मृत्यू झाला असून तिची आई गंभीर जखमी झाली आहे. पुण्याच्या गणेश पेठेतील आज दुपारी घडली घटना आहे.

नाझनीन सादिक शेख (वय 18) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर, हमीदा सादिक शेख (45) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी शरीफ रझाक शेख (वय 18) याला फरासखाना पोलिसांनी अटक आहे.

  • याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफ आणि नाझनीन यांचा विवाह होणार होता. मात्र, किरकोळ वादातून शरीफने होणाऱ्या पत्नी अर्थात नाझनीनवर आणि तिची आई हमीदावर चाकूने वार केले. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी शरीफला अटक केली आहे. लग्नावरून त्यांच्यात वादावादी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<