Pune : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव

एमपीसी न्यूज – शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी हा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला.

विशेष म्हणजे यावेळी शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक भगवे फेटे घालून आले होते. 20 जानेवारी 2020 दुपारी 3 वा. पर्यंत ही सभा तहकूब करण्यात आली. टेबल वाजवून यावेळी आंनद व्यक्त करण्यात आला.

शिवसेना नगरसेवकांनी गळ्यात भगवे उपरने, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गळ्यात राष्ट्रवादीचे उपरने तर, काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या चिन्हाचे गळ्यात उपरने घातले होते. पेढे वाटून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.