Pune : पुण्यात तरुणाने पोलीस चौकी समोरच घेतले स्वत:ला पेटवून

लोणी कंद पोलीस चौकिसमोर आज सकाळी घटना घडली

एमपीसी न्यूज -सोसायटी मध्ये शिवीगाळ व मारहाण झाल्यानंतर तरुणाच्या (Pune )तक्रारी नंतर लोणीकंद पोलीसांनी मारहाण करणाऱ्यां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

मात्र त्यांना अटक करावी अशी त्याची मागणी होती. ती न पूर्ण केल्याने एका तरुणाने मंगळवारी सकाळी वाघोली पोलीस चौकी समोर स्वताहाला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

 

Pune: मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळेत मार्केट डे 

रोहिदास अशोक जाधव असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव (Pune)असून तो 90 टक्के भाजला आहे.त्याच्यावर सूर्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

जाधव हा लोणी कंद भागात सिद्धी पार्क सोसायटी मध्ये राहत होता. या सोसायटी मध्ये पाणी व इतर कारणावरून त्याचा सोसायटी मधील अन्य दोघांशी व बांधकाम व्यावसायिकाशी वाद होता. त्यांच्या विरोधात जाधव ने 2 वेळा तक्रार दिली होती

बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे ते नेहमी  शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा आरोप त्याने ठेवला होता. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलीसांनी त्यांना अटक करावी अशी त्याची मागणी होती. यासाठी तो आज चौकीत आला आणि स्वतः पेटवून घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.