Pune : ‘पर्वती’तील आम आदमी पक्षाचे उमेदवार संदीप सोनवणे भरणार बसफेरीने अर्ज

एमपीसी न्यूज – आम आदमी पक्षाचे पर्वती मतदारसंघातील उमेदवार संदीप सोनवणे 3 ऑक्टोम्बर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत पीएमपीएमएल बसफेरीने येणार आहेत.

आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही माहिती देण्यात आली आहे. प्रचारात सुरवातीपासूनच आम आदमी असलेल्या मतदारांशी नाते जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ३ तारखेला सकाळी १० वाजता अपर इंदिरानगर येथून कुटुंबीय,कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यासमवेत संदीप सोनवणे यांची बसफेरी निघणार आहे. त्यासाठी आवश्यक परवानगी त्यांना मिळाली आहे.

अपर इंदिरानगर, शंकर महाराज मठ, सातारा रस्ता, सारसबाग मार्गे सणस मैदानापर्यंत ही बसफेरी मतदारांशी संपर्क करीत पोहोचेल. पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्ज भरण्याची सुविधा सणस मैदान कार्यालयात असल्याने तेथे अर्ज भरला जाईल.

सामान्यांबरोबर राहणारा प्रतिनिधी म्हणून मला निवडून द्यावे, मी पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करेन, असे संदीप सोनवणे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.