BNR-HDR-TOP-Mobile

Pune  : फुटपाथला धडकून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – फुटपाथला धडकून दुचाकीवरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.1) रात्री दीडच्या सुमारास पद्मावती येथील काहे चौक येथे घडली आहे.

भागवत रामदास डोंबे ( वय 25, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी.एस गुरव यांनी फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत डोंबे हा आपल्या दुचाकीवर बिबवेवाडी येथील पद्मावती येथील काहे चौक येथून रात्री दीडच्या सुमारास जात असताना त्याने गतिरोधकाकडे दुर्लक्ष करून आणि भरधाव वेगात गाडी चालवली. यादरम्यान त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने बाजूला असलेल्या फुटपाथला जोरदार धडक बसली .  या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला .  उपचारासाठी त्याला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.