Pune : अखेर पुणे जिल्ह्याचे पालकत्व अजितदादांकडे, तर चंद्रकांतदादांकडे सोलापूर,  अमरावतीची जबाबदारी

राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

एमपीसी न्यूज – भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर अखेर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तर, विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर,  अमरावती या दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Pune : अखेर पुणे जिल्ह्याचे पालकत्व अजितदादांकडे, तर चंद्रकांतदादांकडे सोलापूर,  अमरावतीची जबाबदारी

राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सुधारित 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.