Pune : रस्त्यावर सुरक्षितता,समान हक्क मिळण्यासाठी इंडो अथलेटिक्स सोसायटीकडून आंदोलन

एमपीसी न्यूज – रस्त्यावर सुरक्षितता,समान हक्क मिळण्यासाठी (Pune) इंडो अथलेटिक्स सोसायटीकडून आंदोलन करण्यात आले. हर्षद पिंगळे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस योग्य ते शासन मिळण्याबाबत व अशा चालकाकडून होणार्‍या त्रासास आळा बसणे बाबत पौड पोलिसांना निवेदन देण्यात आले.

गणेश भुजबळ, अजीत पाटील, गिरिराज उमरीकर, अजित गोरे, अमित पवार, मदन शिंदे, विजय गायकवाड, संतोष नखाते, प्रदीप टाके, हरिप्रिया, दीपक बुरकुल, श्रीकांत चौधरी, अभय खटावकर, शैलेश पाटील, संदीप परदेशी, रमेश पवार, विवेक कडु, अंजली खटावकर, केशव, निलेश टकले, स्मिता गाबादे, संदीप गायकवाड व स्काय मानस लेक सोसायटी सभासद यांनी पुणे विद्यापीठ ते पौड पोलीस स्टेशन सायकल मार्चचे नेतृत्व केले. शहरातील 500 सायकलिस्ट धावपटू असे सहभागी होते. यावेळी पिंगळे कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.

16 ऑगस्ट 2023 रोजी हर्षद पिंगळे हे नेहमी प्रमाणे स्वतः च्या शरीरस्वस्थसाठी पळण्याचा सराव करीत असताना त्यांना भूगाव दरम्यान अनोळखी वाहनाने धडक दिली. यात हर्षद पिंगळे गंभीर जखमी झाले व त्याच दिवशी ते मृत्यूमुखी पडले.

अशा अनेक घटना सध्या सर्रास घडत आहेत. अशा प्रवृत्तीना आळा बसणे व संबधित वाहन चालकास योग्य ती शिक्षा व्हावी. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून आपणाकडून ही उत्तेजक द्रव्य तपासणी, नियमबाह्य़ चालक तपासणी अशा गोष्टी सुरू करण्याची मागणी आयएएसचे संस्थापक सदस्य अजित पाटील यांनी केली.

Alandi : आळंदीमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

महानगरांमध्ये आजकाल सर्रास असे प्रकार घडत आहेत. सकाळच्या वेळी (Pune) मोठ्या प्रमाणात सायकलस्वार व रनरची संख्या वाढली आहे. पण त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत नाही. त्यांच्यासाठी सुरक्षित असे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही, एका बाजूला आपण प्रदूषण मुक्त शहरांचे स्वप्न पाहत आहोत.

परंतु सायकल फ्रेंडली इन्फ्रास्ट्रक्चर बाबत कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यात येत नाही असे आयएएसचे संस्थापक सदस्य गणेश भुजबळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.