Alandi : आळंदीमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचा सण शहरात सोमवारी (दि. 21) सर्वत्र पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीच्या सणाला घरोघरी देव्हाऱ्याजवळ नाग-नरसोबाचे चित्र चिटकवून तसेच देवाजवळ रांगोळी काढून त्याची विधीवत पूजा करण्यात आली.  घरोघरी नाग-नरसोबा या देवतेला लाह्या, दूध, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.

PMC : वेळेत कर भरणाऱ्या करदात्यांना मिळाले पुणे महापालिकेकडून इलेक्ट्रीक स्कूटर ते कारपर्यंतचे बक्षिस

प्रथा परंपरेनुसार आळंदी (Alandi) मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने नाग देवतेची सनई चौघड्यात मिरवणूक निघाली. जुन्या नगरपरिषदेच्या जवळील जागेत नाग देवतेची पूजा करण्यात आली.ही पूजा प्रथम आळंदीतील स्थानिक सेवेकरी  मानकरी(कुऱ्हाडे पाटील,घुंडरे पाटील, चिताळकर पाटील) कुटुंबातील महिलांनी केले.

तसेच नागदेवतेचे लक्ष्मी नारायण मंदिर, राम मंदिर, येथे पुजन करण्यात आले. त्यानंतर नागदेवतेचे माऊलींच्या मंदिरातील पालखी मंडपात आगमन झाले. येथे नाग देवताची पुजा, पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.मंदिरा मध्ये नागपंचमी निमित्त अनेक महिलांनी  फुगड्यांच्या खेळाचा आनंद ही लुटला.

यावेळी अंजना कुऱ्हाडे पाटील, रेखा कुऱ्हाडे पाटील, पुष्पा चिताळकर पाटील, ज्योती चिताळकर पाटील, सृष्टी घुंडरे पाटील, लक्ष्मी कुऱ्हाडे पाटील, परिणिती कुऱ्हाडे पाटील तसेच माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कुऱ्हाडे पाटील, विठ्ठल घुंडरे पाटील, भीमाशंकर वाघमारे, बारकू वाघमारे, पुरुषोत्तम वाघमारे इ. उपस्थित होते.

याबाबत माहिती दिनेश कुऱ्हाडे यांनी दिली. श्रावणी सोमवार निमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरात सुद्धा सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.