PMC : वेळेत कर भरणाऱ्या करदात्यांना मिळाले पुणे महापालिकेकडून इलेक्ट्रीक स्कूटर ते कारपर्यंतचे बक्षिस

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेने रविवारी (दि.20) वेळेत कर भरणा (PMC ) करणाऱ्या नागरिकांसाठी ‘लकी ड्रॉ’ उपक्रमातील विजेत्यांची नावे जाहीर केली. नागरिकांना त्यांचा मालमत्ता कर वेळेत भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विजेत्यांना कार, इलेक्ट्रिक स्कूटर आदींसह बक्षिसे देण्यात आली.

या उपक्रमांतर्गत पाच भाग्यवान नागरिकांना पेट्रोल कार, तर 15 जणांना इलेक्ट्रिक स्कूटर आणि एकूण 45 जणांना लॅपटॉप आणि आयफोनसह बक्षिसे मिळाली.

Chinchwad : पोलिसांच्या कामगिरीवर माझा ठाम विश्वास – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

या कार्यक्रमात पात्र व्यक्तींना पेट्रोल कार, ई-बाईक, मोबाईल फोन (PMC) आणि लॅपटॉपसह एकूण 45 बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमात 31 जुलैपूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता आणि कर भरण्याची शेवटची तारीख वाढल्यानंतर 2 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. 0 ते 25 हजार रुपये, 25 हजार ते 50 हजार रुपये आणि 50 हजार ते 1 लाख रुपये अशा तीन वेगवेगळ्या श्रेणीतील करदात्यांना बक्षिसे जाहीर करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.