Pune: अनंतराव पवार महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांमध्ये खेळांची आवड रुजावी. तसेच सुदृढ आरोग्य राहावे, यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या क्रीडा स्पर्धांचे उदघाटन आज क्रीडापटू मनोज पवळे आणि प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रवीण चोळके व डॉ. महेंद्र अवघडे, क्रीडा विभागप्रमुख अनिल मरे, डॉ. आनंद महाजन, प्रा. मिनाली चव्हाण, कार्यालयीन अधीकक्षक दिलीप बावधाने, डॉ. किसन पालके, प्रा. हेमंत उबाळे, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये सांघिक प्रकारात क्रिकेट, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, थ्रो-बॉल, तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिनाली चव्हाण, प्रास्ताविक प्रा. अनिल मरे, पाहुण्यांचा परिचय डॉ. आनंद महाजन व आभार प्रदर्शन डॉ. महेंद्र अवघडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.