Pune : शहरात आणखी एक ‘कोरोनाबळी’; कोरोनाबाधित मृतांचे ‘अर्धशतक’

पुणे शहरात  दिवसभरात नवीन ४३ कोरोनाबाधित रुग्णांची भर

एमपीसी न्यूज : शहरात आज आणखी एका कोरोनबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबळींचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. तर ससून रुग्णालयात आज नव्याने 12 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पुणे शहरात  दिवसभरात नवीन ४३ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली.  तर  आज आणखी 4 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून ते आता कोरोनामुक्त झाले आहेत.  3  रुग्णांवर  नायडू रुग्णालयात तर एका रुग्णावर ‘जहांगीर’मध्ये उपचार सुरू होते. 

असे असले तरी मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांच्या मनातील भीती थोडी कमी झाली आहे. मात्र, या पुढील काळात 8  दिवस लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

आजपर्यंत कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याल्या 37  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.   ससून रुग्णालयातील 54 रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्या पैकी 12  रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 544 वर पोहोचली आहे. तर आज आणखी 40 संशयित रुग्ण ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर 14  रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

ससूनमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णाचे वय 70  वर्ष होते. हा रुग्ण गंजपेठेत वास्तव्यास होता. तसेच त्याला टीबीचा आजार होता. 11  एप्रिलला या रुग्णाला ससूनमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आज ( शनिवारी) या रुग्णाचा मृत्यू झाला.

पुणे शहरात आज दिवसभरात नव्या 43  कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. नायडू 17 , ससून 9, रुबी 8, दीनानाथ 4, केईएम आणि नोबेल प्रत्येकी 2 तर सह्याद्री 1  असा नव्या रुग्णांचा तपशील आहे.

शहरात आजपर्यंत 3606 रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल झाले. शहरात 418 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयात 72 , सिम्बॉयसिसमध्ये 100, बोपोडी रुग्णालयात 12 तसेच उर्वरित रुग्ण विविध रुग्णालयातील रुग्णांचा समावेश आहे. ससूनमध्ये 126  व पुणे महापालिका हद्दीत 418  असे एकूण 544  कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.