Pune : महिला सबलीकरणासाठी ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ उपक्रम

एमपीसी न्यूज – वंचित विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने ‘आपली (Pune) दिवाळी स्वदेशी दिवाळी’ उपक्रमाचे 1 ते 5 नोव्हेंबर 2023 या कवलधीत म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेच्या संचालक मीना कुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खादी ग्रामोद्योगचे निमंत्रक योगेश गोगावले, वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, हर्षद नातू, तेजस्विनी थिटे, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.

मीना कुर्लेकर म्हणाल्या, स्त्री एक शक्ती असून, समाजाने त्यांना आदराची वागणूक द्यायला हवी. त्याग, सेवा, सहनशीलता, करुणा आणि कष्टाची विलक्षण ताकद असलेल्या स्त्रीला आश्वासक सामाजिक आधार मिळाला, तर तिला तिच्या पायावर सक्षमपणे उभा राहता येईल.

याच भावनेतून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ उपक्रमासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष रवींद्र साठे उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. परिस्थितीशी झगडून यशस्वी व्यावसायिक झालेल्या 15 उद्योजकांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.”

Pune : ब्लॉकचेन आणि डीसेंट्रलाइज फायनान्स विषयावर भारती विद्यापीठात कार्यशाळा संपन्न

योगेश गोगावले म्हणाले, “देशाचा विकास व समृद्धीकरिता स्वदेशीचा वापर गरजेचा आहे. महिला सक्षमीकरणाला पाठबळ (Pune) देण्यासाठी पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी. प्रदर्शनात पाचही दिवस आगळ्या-वेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम असणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी विविध योगातील नागरिकांनी खादीचे कपडे परिधान करून येण्याची कल्पना असून उत्कृष्ट वेशभूषेची बक्षिसे दिली जाणार आहेत.

खादीचा प्रसार व प्रचार व्हावा, हा यामागे उद्देश आहे. हतकागदावर पुण्यातील एसपीएम इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांचा लक्षणीय सहभाग आहे. मुलांच्या कौशल्य विकासासाठी, तसेच पर्यावरण रक्षणाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने 2022-23हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले असून, आरोग्यदायी व पौष्टिक भरडधान्याचा आहारात वापर वाढण्यावासाठी भरड धान्यावर विशेष स्टॉल्स असणार आहेत.”

 

तेजस्विनी थिटे म्हणाल्या, “बचत गटातील महिलांची विविध उत्पादने, खाद्यपदार्थ, सिल्क साड्या, हँडमेड ज्वेलरी, कलमकारी कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकला, शाळेतील मुलांनी बनवलेल्या हात कागदाच्या वस्तू, भरडधान्य, सुकामेवा, हर्बल उत्पादने, गिफ्ट आर्टिकल्स, होम डेकोरेशन, बी-बियाणे, दिवाळी फराळ, इलेक्ट्रिकल वेहिकल, वुडन क्राफ्ट, सौंदर्य प्रसाधने, पर्यावरण पूरक उत्पादने, ज्वेलरी आदी स्टॉल्स असणार आहेत. उत्कृष्ट प्रतीचा सुकामेवा इथे अल्पदरात उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रदर्शनात भरड धान्य व त्यापासून तयार केलेल्या विविध पाककृती, चटपटीत पदार्थांचे आकर्षण असणार आहे.”

महिला व्यावसायिकांना सक्षम करण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला व्यवसायिकांनी वंचित विकास संस्थेच्या कार्यालयात (020-24483050) संपर्क करावा, असे आवाहन वंचित विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.