Pune News : युक्रेनमध्ये अडकले असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर सिंह यांनी केले आहे.

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथील मदत कक्ष –

केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797
दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905
फॅक्स – 011-23088124
ई मेल – [email protected]

पुणे जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक –

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे फोन – 020-26123371

ईमेल – [email protected]

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.