Pune : सराईतांना अटक करून सव्वा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त ; हडपसर पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – सराईतांना सापळा रचून हडपसर पोलिसांनी काल मंगळवारी (दि.8) 12 च्या सुमारास मंत्री मार्केट येथून अटक केली आहे.
आरोपींकडून चोरीचा सव्वादहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अजय महेंद्र शिंदे (वय 23 रा.रामटेकडी) , छोटेलाल रामदुलारे गुप्ता (वय 38,रा वैदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिसांना गस्त घालत असताना त्यांच्या बातमीदारांकडून हडपसर परिसरात एक संशयित इसम चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार हडपसर पोलिसांनी सापळा रचून संशयितास मोबाईल ने भरलेल्या पिशवीसह ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली या चौकशीदरम्यान त्याने पिशवीतील मोबाईल हे चोरीचे असल्याचे कबूल केले पोलिसांनी त्याला अटक करून तपास केला असता आरोपीने त्याच्या अल्पवयीन साथीदारासह या चोऱ्या केल्याचे उघडकीस आले.

आरोपींकडून हडपसर पोलिसांनी चोरीची एक चार चाकी 5 दुचाकी, 40 मोबाईल, 40 ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच 15 हजारांची रोकड, 1 कॅमेरा, 1 लॅपटॉप असा एकूण 10 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलिस कस्टडी मंजूर केलेली आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी,पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक कुंभार, शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस शिपाई नितीन मुंढे,पोलीस नाईक प्रमोद टिळेकर, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, पोलीस नाईक विनोद शिवले, पोलीस नाईक युसुफ पठाण, पोलीस शिपाई गोविंद चिवळे, पोलीस शिपाई अकबर शेख, शशिकांत नाळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.