Pune : कलाकारांनी स्टुडीओमधून बाहेर पडत लोकापर्यंत कला पोहोचवावी- चित्रकार प्रमोद कांबळे

एमपीसी न्यूज –  गायक रसिकांसमोर गातो, व्याख्याता (Pune) श्रोत्यांसमोर आपली वक्तृत्व कला सादर करतो. त्यांचे कौशल्य हे सादरीकरणाद्वारे हजारो नागरिक पाहत असतात, अनुभवत असतात. चित्रकार, शिल्पकारांनी देखील आता आपली कला लोकांपर्यंत पोहोचवायला हवी. केवळ स्टुडीओमध्ये काम करणे आज पुरेसे नसून येत्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार प्रमोद कांबळे यांनी केले.

सुरेंद्र करमचंदानी यांच्या संकल्पनेतून आणि आर्ट पुणेचे संजीव पवार यांच्या पुढाकाराने घोले रस्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हीनस आर्ट फेस्ट’ दरम्यान प्रमोद कांबळे बोलत होते.

Pune : दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे 9 हजार  वारक-यांची नेत्र व आरोग्य तपासणी 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध पेपर मॅशे कलाकार भारती पित्रे व उद्योजक अजय पित्रे, लेखक व साईवाणी या समाजसेवी संस्थेचे अॅड सुनील करपे, सुरेंद्र करमचंदानी, प्रमोद करमचंदानी, प्रियंवदा व संजीव पवार आणि रणजीत जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रमोद कांबळे यांनी पोट्रेट (व्यक्तिचित्र) चित्रकलेचे विशेष प्रात्यक्षिक देखील सादर केले. पु. ल. देशपांडे यांची सही असलेल्या 1919 या नव्या पेनच्या मॉडेलचे अनावरण देखील यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

या कलामहोत्सवामध्ये व्यावसायिक व ज्येष्ठ चित्रकार, कलाशाखेचे विद्यार्थी आणि हॉबी आर्टिस्ट (हौशी कलाकार) अशा तीन विभागात तब्बल 100 कलाकृती पाहण्याची संधी कलाप्रेमींना मिळाली. याबरोबरच भगवद्गीता आणि वाल्मिकी रामायण हे ग्रंथ अनोख्या पुस्तक संचाच्या स्वरूपात या कला महोत्सवात उपस्थितांना पाहता आले.

यावेळी पोट्रेट प्रकारात आर डी कांबळे, आदित्य शिर्के, मंजिरी (Pune) मोरे, उत्तम साठे तर वॉटरकलर प्रकारात संजय देसाई, संदीप यादव, शंतनू साळुंखे, शैलेद्र एम, विलास कुलकर्णी आदी कलाकारांची  प्रात्यक्षिके विनामूल्य झाली. चिंटूचे निर्माते असलेले चारुहास पंडित यांनी चिंटूच्या मॅस्कॉट सोबत उपस्थितांना दिलेले चित्रकलेचे प्रात्यक्षिक हे महोत्सवाचे खास आकर्षण ठरले.

व्हीनस आर्ट फेस्टमध्ये निवड झालेल्या कलाकारांपैकी उल्लेखनीय कला सादर केलेल्या अक्षय साखरे, मेहेक दमानी, अद्विका निकाळजे, तेज साळुंखे, अर्जुन जगदाळे या चित्रकारांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. रणजीत जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.