Pune : तृतीयपंथी समितीकडून नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

एमपीसी न्यूज : ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Pune)यांच्यावर टीका करताना भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी अपशब्दाचा वापर केला. या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.

या आंदोलनात राज्य समन्वयक शामिभा पाटील, निकिता मुखदल यांनी सहभागी होऊन नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

Pune : प्रवासी व प्रशासन यांच्यातील सुसंवादासाठी पीएमपीएमएल कडून प्रवासी दिन उपक्रमाचे आयोजन

यावेळी तृतीपंथी हक्क समितीच्या राज्य समन्वयक शामिभा पाटील म्हणाल्या की, समाजामध्ये तृतीयपंथी व्यक्तिची एक ओळख असून आम्ही आमच्या हक्कासाठी आज देखील लढत आहे.

आम्हाला न्याय मिळावा यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही. पण, आमच्या समाजाबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतेवेळी  (Pune)अपशब्दाचा वापर केला आहे. त्या विधानाचा आम्ही निषेध व्यक्त करत असून नितेश राणे विरोधात तक्रार देणार आहे.

आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहे. तसेच यापुढील काळात नितेश राणे जिथे भेटेल तिथे तोंडाला काळ फासणार असा इशारा देखील त्यांनी यावेळी नितेश राणे यांना दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.