Pune : प्रवासी व प्रशासन यांच्यातील सुसंवादासाठी पीएमपीएमएल कडून प्रवासी दिन उपक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – बस सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी, प्रवासी सेवा लोकाभिमुख होण्यासाठी व प्रवाशांचे मोलाचे मार्गदर्शन परिवहन महामंडळाला मिळावे या करीता पीएमपीएमएलच्या वतीने प्रत्येक आगारामध्ये महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी दुपारी तीन ते पाच यावेळेत प्रवासी दिन उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Chikhali : अपमानाचा बदला घेण्यासाठी झाला ‘त्या’ वृद्ध महिलेचा खून

पुणे (Pune) महानगर परिवहन महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे. पीएमपीएमएलच्या संचलीत मार्गांवर, स्थानकावर प्रवासी वर्गास चांगली, तत्पर व विश्वसनीय बस सेवा देण्याच्या दृष्टीने व बससेवेबाबत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी/तक्रारींची तातडीने दखल घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असणार आहे.

प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन कामामुळे किंवा वेळेअभावी आगारात येऊन तक्रार किंवा सूचना करता येत नाहीत. यावर उपाय म्हणून प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या मुख्य बस स्थानकांवर व पास केंद्रांवर अर्ज देता येणार आहे. या उपक्रमातून तक्रारी कमी होत प्रवासी व पीएमपीएमएल यांच्यात सुसंवाद वाढेल अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

तरी प्रवाशांनी प्रवासी दिन या उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.