Pune : बच्चे कंपनीने साजरा केला महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस

एमपीसी न्यूज : चित्रपट क्षेत्रातील पाच दशकांहून अधिक (Pune) काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे महानायक अमिताभ बच्चन यांचा 81वा वाढदिवस बच्चे कंपनीच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला.

साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा यांच्या संकल्पनेतून गेल्या आठ वर्षांपासून मुलांच्या उपस्थितीत महानायक अमिताभ बच्चन यांना वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.

Maval : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन

शनिवार पेठेतील आयडिअल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज (दि. 11) मुलांनी महानायक अभिताभ बच्चन यांचे मुखवटे (Pune) घालून, केक कापून अभिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या.

महानायक अमिताभ बच्चन यांचे चित्रपटातील गाजलेले काही संवादही मुलांनी या वेळी सादर केले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना आहेर, गोकुळ डुंबरे, संगीता म्हस्के, सुनीता शिंदे, नरेंद्र व्यास, कुमार अनवेकर, गंधाली शहा, प्रल्हाद थोरात आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.