Pune : जिल्हयातील 6 बोगस इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर मोठी कारवाई

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हात सुरु आसलेल्या (Pune) इंग्रजी माध्यमाच्या 6 बोगस शाळांवर मुळशी पंचायत समितीच्या गटशिक्षण आधिकार्यांनी  मोठी कारवाई केली आहे. 4 शाळांवर दंडात्मक तर 2 शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश दिले आहेत.

Pune : सेवा हाच भारताचा खरा स्वभाव – भैय्याजी जोशी

 

पुण्यातील बावधन बुद्रकू परिसरात सुरु आसलेली एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी परिसरातील साई बालाजी पब्लिक स्कूल नेरे दत्तवाडी या 2 शाळांवर फौजदारी गुन्हा तर पेरिविनील इंग्लिश मिडीयम स्कूल ,पिरंगुट व  संस्कार प्रामयरी स्कूल पिरंगुट,बावधन बुद्रुक येथील जी.जी.इंटरनॅशनल स्कूल या शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश गटशिक्षण आधिकारी के.डी.भुजबळ यांनी दिले आहे.

पुणे जिल्ह्यात  बेकायदेशीर इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु असल्याच्या बातम्यांची दखल घेत ही  कारवाई (Pune) करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.