_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : भाजपाने वाढीव वीज बिलांचा हार पाठवला ऊर्जा मंत्र्यांना

रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात आंदोलन : BJP sends garland of increased electricity bills to energy minister

एमपीसी न्यूज – वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ भाजपने मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळी 10.30 वाजता रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. पुणेकर नागरिकांच्या वतीने वाढीव वीज बिलांचा हार ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना पोचविण्यासाठी महावितरण एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर श्री बुंदिले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. माजी आमदार योगेश टिळेकर, गणेश बिडकर, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सर्व मंडलांचे अध्यक्ष नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

आधीच पुणेकर कोरोनाच्या संकटामुळे हैराण झाले आहेत. त्यात वाढीव वीज बिले देण्यात येत असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न पुणेकरांनी उपस्थित केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

वाढीव वीज बिले तातडीने रद्द करण्यात यावीत, सरासरी पाठवलेली वीज बिलेही रद्द करण्यात यावीत, सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात यावी, 300 युनिटपर्यंतचे विज बिल सरसकट माफ करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

महावितरणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बुंदिले यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पुणेकर नागरिकांच्या वरील मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास प्रखर जन – आंदोलनाचा इशारा जगदीश मुळीक यांनी यावेळी दिला.

कोरोना संकटाच्या काळात सर्व नागरिक प्रचंड अडचणीत असताना, महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारची कोणतीही अन्यायकारक कारवाई करू नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.