Pune : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीर

एमपीसी न्यूज : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन व सर परशुरामभाऊ महाविद्यालय यांच्या (Pune) वतीने शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. एस.पी. कॉलेज येथे सोमवार 20 मार्च 2023 सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हे रक्तदान शिबीर होणार आहे.

फाऊंडेशनच्या संस्थापक गीता गोडबोले यांच्या माहितीनुसार या शिबिरात संकलित होणारे रक्त आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज (ए. एफ. एम. सी.) ला दिले जाणार आहे. आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, स. प. जिमखाना, एनसीसी, एनएसएस चा सहभाग या शिबिरात असणार आहे. भाजपाचे संघटन सचिव राजेश पांडे उपस्थित राहणार आहेत.

Pune : जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे पुण्यात ठिय्या आंदोलन

सामाजिक उपक्रमातून वीरांचे स्मरण करणे हे या रक्तदान शिबिराचा हेतू आहे. 2003 साली वयाच्या 23 व्या वर्षी कॅप्टन सुशांत यांना ऑपरेशन पराक्रम दरम्यान जम्मू येथे वीरमरण आले . त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम करण्यासाठी त्यांच्या मातोश्री गीता गोडबोले यांनी ‘शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन’ स्थापन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.