Pune Bye-Election : नाना पटोले यांच्या विनंतीवरून बाळासाहेब दाभेकर यांनी अखेर उमेदवारी अर्ज घेतला मागे

एमपीसी न्यूज : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर (Pune Bye-Election) यांनी आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला. काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने नाराज होऊन त्यांनी पक्षात बंडखोरी करून अर्ज भरला होता. त्यांनी तो मागे घ्यावा, यासाठी अनेक काँग्रेस नेते विनंती करीत होते. तरीही ते मागे हटण्यास तयार नव्हते. परंतु, नाना पटोले यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला. काय घडले नेमके जाणून घेऊया – 

शिवसेनेचे विशाल धनवडे, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दाभेकरांची भेट घेतली होती. त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली. परंतु, तरीही ते आपल्या उमेदवारीवर ठाम होते.

त्या नंतर काँग्रेस पक्षाचे प्रभारी आमदार संग्राम थोपटे, अरविंद शिंदे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, अजित दरेकर यांनी बाळासाहेब यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. त्यात्यावेळीही बाळासाहेबांना सर्वांनी विनंती केली, की आपण माघार घ्यावी, पक्ष आपल्यावरील अन्याय निश्चित दूर करेल. परंतु, बाळासाहेबांनी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असे सांगितले.

Baramati : शेतीमध्ये सर्वाधिक उद्योग निर्मितीची क्षमता – सुधीर मुनगंटीवार

परंतु, अखेरीस नाना पटोले यांच्या सांगण्यावरून बाळासाहेब (Pune Bye-Election) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.