Pune : विद्यापीठ येथील मुख्य चौकात कार पेटली!; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – पुणे विद्यापीठ येथील मुख्य चौकात चारचाकी कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे अनेकांची धावपळ झाली. या घटनेत कुणीही जखमी नाही, मात्र कार संपूर्णपणे जळून खाक झाली.

कारला अचानक लागलेल्या आगीने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.