Pune: पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेले पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या आमदार आणि पालकमंत्री पदाचा मंगळवारी (दि.4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला राजीनामा दिला होता. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री कोण? होणार याची उत्सुक्ता लागली होती. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि पुणे जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नावांची पालकमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा होती.

  • विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघापैकी एकाला मंत्रीमंडळात घेऊन पालकमंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा होती. परंतु, मख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याबाहेरील नेत्याकडे पालकमंत्रीपद दिले आहे.

पुण्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. तर, जळगावच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.