Pune : ‘ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजारांची मदत

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाला मदतीचा ओघ सुरू आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासनाला हातभार लावण्याच्या भावनेतून पुण्याच्या वडगाव शेरी येथील ‘ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च’ यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पन्नास हजाराची मदत देण्यात आली आहे.

या मदतीचा धनादेश चर्च पदाधिकार्‍यांकडून पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्चच्या वतीने सेक्रेटरी पद्मांकर पवार आणि प्रिस्ट इन चार्ज प्रशांत बोर्डे उपस्थित होते.

ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्चच्या वतीने लाॅकडाऊनच्या काळात जवळपास 55 कुटुंबांना मदतीचा हात देऊ केला आहे. या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत 500 किलो गहू, 500 किलो तांदूळ, 125 किलो साखर, 125 किलो तेल तसेच डाळ, साबण असे 75,000 रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे गरजूंना वाटप केले आहे.

वडगाव शेरी हद्दीतील पोलीस ठाण्यामधील पोलिस कर्मचाऱ्यांना सॅनीटायझर, एन 95 मास्क यांचे वाटप करण्यात आले. तसेच कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चर्चच्या वतीने जलपानाची व्यवस्था देखील करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.