Pune : ‘ते’ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा ताबाच घेऊ शकत नाही : प्रशांत जगताप

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ दोन दिवसापूर्वी घेतली. त्या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असून शरद पवार की अजित पवार यांच्या सोबत जायच अशा संभ्रम अवस्थेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आहेत.

Alandi : महिलेने घराजवळच लावली दारूभट्टी; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

त्याच दरम्यान उद्या शरद पवार आणि अजित पवार यांनी बैठकीच आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण आता नेमक कोणासोबत जायच, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहे. पुणे (Pune ) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकारिणीची बैठक पार पडली.या बैठकीला खासदार वंदना चव्हाण,प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या सह आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

त्या बैठकीनंतर प्रशांत जगताप यांना मुंबईत पक्ष कार्यालयावरुन वाद झाल्याची घटना घडली आहे.त्यामुळे भविष्यात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा ताबा मागितल्यास तुमची भूमिका काय राहणार त्या ते म्हणाले की,पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयाबाबत संबधित व्यक्ती सोबत जो करार झाला आहे.

त्यावर प्रशांत सुदामराव जगताप असा आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा कुठे ही उल्लेख नाही.त्यामुळे भविष्यात कोणी ताबा करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा ताबाच घेऊ शकत नाही अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.