NCP News : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही; पुण्यातील बैठकीत नेत्यांनी स्पष्ट केली भूमिका

एमपीसी न्यूज – शरद पवार गट काँग्रेसमध्ये (NCP News) विलीन होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका वरिष्ठ नेते मंडळींनी व्यक्त केली. तर, विलीनीकरणाचा विषय हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. मात्र, त्यावर चर्चा चालू आहे, अशी प्रतिक्रिया मंगलदास बांदल यांनी दिली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राज्यभर चर्चा सुरू झाली. आजच्या बैठकीत पक्षनाव आणि चिन्हाबाबत चर्चा झाली. दुसऱ्या पक्षात विलिन होण्याच्या बातम्या तथ्यहीन आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्णय करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या नावाने जनतेत जाईल आणि निवडणूक लढवेल, असं प्रशांत जगतापांनी स्पष्ट केलं.

सोशल मीडिया, महाराष्ट्रातील जनता आणि तरुण पिढीवर माझा एवढा विश्वास आहे की कोणतंही नाव आणि चिन्ह मिळालं तरी 59 मिनिटांच्या आत संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हे चिन्ह पोहोचेल. आमच्यादृष्टीने शरद पवार हेच नाव आणि चिन्ह, त्यामुळे कोणतंही नाव आणि चिन्ह मिळालं तरी चालेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विलिनीकरणासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. (NCP News)

Pune : पुणे नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीत विलिनीकरणाचा विषय झालेला नाही. ही बातमी चुकीची आहे, असे शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.