Pune : कडाक्याच्या थंडीत प्रजासत्ताकदिन साजरा

एमपीसी न्यूज – प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांना ध्वजवंदन करताना कडाक्याच्या थंडीचा अनुभव घ्यावा लागला.

शहरात आज 8.3 अंश सेल्सियस  इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. थंडीचा कडाका वाढला तरी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह मात्र कायम असल्याचे पहायला मिळत होते.

या मोसमात शहरात 5.9 अंश सेल्सियस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यापेक्षा आजचे किमान तापमान जास्त असले तरी ध्वजवंदनासाठी पहाटे आणि सकाळी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे आजची थंडी हा सर्वत्र चर्चेचा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.