Pune : पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करा : जगदीश मुळीक

Complete pre-monsoon works immediately: Jagdish Mulik

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी देखभाल-दुरुस्ती, नालेसफाई, सिमाभिंतीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गुरुवारी प्रशासनाला केल्या.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी भाजपच्या नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली.

मुळीक म्हणाले, ‘कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करीत असताना पावसाळ्यापूर्वी करावयाची विविध कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वस्ती विभागांमध्ये विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, आरोग्य विभागाने बेडसची उपलब्धता, औषधांचा पुरवठा, आवश्यक वैद्यकीय उपकरणे यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.’

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ठराविक वेळेत उघडी ठेवावीत, साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी औषध फवारणी करावी. तातडीच्या विकासकामांसाठी खात्यांतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा, झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची तातडीने झाटणी करावी, अशा सूचना मुळीक यांनी यावेळी केल्या.

माजी आमदार बापूसाहेब पठारे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक योगेश मुळीक, महानगरपालिका उपआयुक्त विजय दहिभाते, सहाय्यक महापालिका आयुक्त विजय लांडगे, राजेश बनकर, वैद्यकीय अधिकारी रेखा गलांडे, नगरसेवक बापूराव कर्णे, नगसेविका सुनिता गलांडे, नगरसेविका शीतल सावंत, नगरसेविका शीतल शिंदे, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, नगरसेवक राहुल भंडारे, नगरसेवक संदीप जर्हाड, संतोष लाला खांदवे, मारुती गलांडे, ज्ञानेश्वर शिंदे, महेश गलांडे, अर्जुन जगताप, आशुतोष जाधव, अरविंद गोरे आदी या बैठकीला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.