_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune: प्रधानमंत्री कार्यालयातील उपसचिवपदाच्या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा

Congratulations from the Deputy Chief Minister to the District Collector on the appointment of Deputy Secretary in the Prime Minister's Office

एमपीसी न्यूज – पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

पुण्याच्या प्रश्नांची जाण असणारे अधिकारी नवल किशोर राम यांना प्रधानमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे, ही चांगली बाब असून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी  ते  प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री  पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी देखील नवल किशोर राम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.