Pune : कोरोनाचे 208 नवे रुग्ण, 159 जण ठणठणीत बरे; 7 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे गुरुवारी 7 जणांचा मृत्यू झाला. तर, 208 नवे रुग्ण आढळले. पुणे शहरात आतापर्यंत या रोगामुळे 227 जण दगावले. शहरात कोरोनाचे एकूण 4 हजार 107 रुग्ण असून, 159 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना या आजरातून बरे झालेले 2 हजार 182 रुग्ण आहेत. सध्या 1 हजार 6898 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 169 जण गंभीर रुग्ण आहेत. तर, 44 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

ताडीवाला रोड भागातील 65 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, मार्केटयार्ड भागातील 64 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 52 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 50 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 74 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, नागपूर चाळमधील 42 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, गंजपेठेतील 84 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. मृतांमध्ये 5 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात 4 हजार 717 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 363 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 114 आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 192 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. आज 192 नवीन कोरोना रुग्ण आढळले. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावे. तर, दुसरीकडे या रोगातून मुक्त होणार्याचे प्रमाणही मोठे आहे.

सध्या कोरोनाचा चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. पुणे शहरातील कोरोनाचे रुग्ण 4 हजारांच्या पुढे गेला आहे. आणखी 10 दिवसांत 1 हजार रुग्ण वाढण्याचा अंदाज महापालिका प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.