Pune: 877 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचा कोरोना कवच आरोग्य विमा काढा -आबा बागुल 

एमपीसी न्यूज – आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांचा 877 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचा कोरोना कवच आरोग्य विमा महानगरपालिकेने काढावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

पुणे शहरात दिवसाला हजार रुग्ण सापडत असून आज रोजी पुण्यात 100264 रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह असल्याबाबत प्रशासनाकडून माहिती मिळत आहे. शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात नागरिकांना उपचार देण्यासाठी सार्वजनिक हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात नसून, पुणे महानगरपालिका देत असलेल्या रेटने खासगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास तयार नाही. तसेच रोजगार गेल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कोरोनावरील उपचार घेण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे आबा बागुल म्हणाले.

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने सर्वात कमी प्रीमियममध्ये कोरोना कवच विमा दिला असून यामध्ये 40 वर्षापर्यंत वय असणाऱ्या प्रती व्यक्तीस  वनटाईम  877 रुपये व 41 ते 60 वर्षापर्यंत वय असणाऱ्या  प्रती व्यक्तीसाठी वनटाईम 1168 रुपये वनटाईम प्रीमियम भरून 2 लाख रुपयांचा कोरोना कवच आरोग्य विमा साडे नऊ महिन्यांसाठी काढण्यात येतो. हा आरोग्य विमा काढल्यास कोरोना झालेल्या व्यक्तीस भारतामध्ये कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा मिळून त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातील.

यामाध्यमातून कोरोना रुग्णांवर त्वरित उपचार होतील. कोणत्याही नागरिकाचा उपचाराविना जीव जाणार नाही. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींन बरोबर बैठक घेऊन लवकरात लवकर पावले उचलावी, अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या पत्रात आबा बागुल यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.