Pune Corona Update: नवे 1506 रुग्ण, 1791 कोरोनामुक्त तर 23 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (शनिवारी) नव्याने 1,506 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 55 हजार 761 झाली आहे. दिवसभरात 1,791 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 17 हजार 512 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या आता 2 लाख 79 हजार 255 झाली असून शनिवारी 5 हजार 863 टेस्ट घेण्यात आल्या

शहरातील 1,791 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 36 हजार 914 झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 17 हजार 512 रुग्णांपैकी 638 रुग्ण गंभीर असून यातील 389 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 249 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

शहरात शनिवारी 23 कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले असून यात ससून रुग्णालयात 5, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 5, भारती रुग्णालयात 2, सह्याद्री रुग्णालय (कर्वे रोड) 2, रुबी हॉल क्लिनिक, राव नर्सिंग, पूना हॉस्पिटल, सरदार हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल आणि ‘ओ अँड पी’मध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शहरातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1,335 वर पोहचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.