Pune Corona Update : दिवसभरात 321 रुग्णांना डिस्चार्ज, 295 नवे कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – पुण्यात आज दिवसभरात 295 नव्या कोरोनाबाधितांची तर 321 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

पुणे पालिका हद्दीत 20 कोरोनाबाधित रुग्ण तर पुण्याबाहेरील 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 501 इतकी झाली आहे. शहरात 451 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2738 झाली आहे.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 74 हजार 840  इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 63 हजार 601 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 958 नमुने घेण्यात आले आहेत.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.