PUNE Corona Update दिलासादायक; प्रतिदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन आकड्यावर !

0

एमपीसी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या चार आकडे पार करत होती. परंतु आज पहिल्यांदाच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 489 म्हणजेच तीन आकड्यांवर आल्यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण होत आहे.

गत 24 तासात पुणे शहरातील तब्बल 681 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात केवळ 489 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 21 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 15 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. एकट्या पुणे शहरात आतापर्यंत एकूण 3941 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत पुणे शहरात 10 हजीर 323 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 838 रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत. यातील 446 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

संपूर्ण शहरात महापालिकेच्या वतीने जंबो कोविड केयर सेंटरसह एकूण 27 कोविड केयर सेंटर सुरू केली होती. मात्र आजमितीला त्यापैकी केवळ 6 कोविड केयर सेंटर सुरू आहेत.

या कोविड सेंटरवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी 500 हून जास्त महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात पुन्हा सेवेत जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे गेली सहा महिने संथ गतीने चालणाऱ्या महापालिकेच्या दैनंदिन प्रशासकीय कामांना गती मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.