Pune Corona Update : कोरोना रुग्णवाढ कायम ! आज नवे 3509 कोरोनाबाधित; 1410 डिस्चार्ज, 24 मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज (बुधवारी) नव्याने 3509 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 44 हजार 343 इतकी झाली आहे. दिवसभरात 1 हजार 410 रुग्णांना डिस्चार्ज तर नव्याने 24  मृत्यूची नोंद झाली.

पुणे महापालिका हद्दीत आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 114 इतकी झाली आहे. शहरातील 1 हजार 410 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला.  शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 12  हजार 714  झाली आहे.

शहरात आज एकाच दिवसात 16  हजार 185  नमुने घेण्यात आले. त्यामुळे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 13  लाख 66  हजार 184  इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 26  हजार 515  रुग्णांपैकी 589  रुग्ण गंभीर, तर 1044 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.