Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 17 रुग्णांची नोंद; 90 सक्रिय रुग्ण, 3 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत  आज (बुधवारी ) 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 90 इतकी झाल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली. कोरोना मुक्त झालेल्या 3 रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, रात्री नऊ वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1507 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज मेन बाजारात सर्वाधिक 6 रुग्णांची नोंद झाली. शगुन सोसायटी, पारशी चाळ आणि सिद्धीविनायक नागरी, पुणे- मुंबई रोड येथे प्रत्येकी 2, तर चिंचोली, दत्तनगर, श्री विहार सोसायटी येथे प्रत्येकी एक अशा एकूण 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. सध्या 4 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत एकूण 1381  रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये 78 रुग्ण असून हद्दीत एकूण 90 सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोना मुक्त झालेल्या 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण दाखल नाही. हिंजवडी येथील विप्रो डीसीएचसी येथे 7 रुग्ण उपचार घेत आहेत. पिंपरी चिंचवड कोरोना केअर सेंटरमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.

कोरोनामुळे आजपर्यंत 36 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.