Pune Crime : प्रेम संबंध तोडल्याने प्रेयसीला मारहाण करत आयुष्यभर त्रास देण्याची धमकी, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : प्रियकरासोबतचे नाते (Pune Crime) तोडल्याने प्रेयसीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव खुर्द परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी 22 वर्षे पूर्ण विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीस वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Melodies of Asha Bhosale : घ्या आशा भोसले यांच्या गाण्यांचा आनंद… त्याच बरोबर जिंका आकर्षक भेटवस्तू!

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दोघांचे प्रेमसंबंध होते. पण, त्यांच्या प्रेमाबाबत कुटूंबाला समजले. त्यामुळे तरुणीने दोघांमधील प्रेमसंबंध तोडले. त्याचा राग आल्याने प्रविणने तरुणीचा पाठलाग केला. तर, तिला मारहाण केली. तिच्या मैत्रीणीला देखील शिवीगाळ केली. रिलेशनशिपमध्ये न राहिल्यास (Pune Crime) आयुष्यभर त्रास देण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.