Pune Crime : पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच; सात ठिकाणाहून वीस लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहराच्या (Pune Crime) वेगवेगळ्या भागात चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. यातच पुन्हा एकदा पुणे शहरातून एकाच दिवशी सात ठिकाणी जबरी चोरी झाली. यामध्ये तब्बल 19 लाखाचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला. धनकवडी, औंध, मुंढवा, लोणी काळभोर, कोंढव्यात या चोरीच्या घटना घडल्या.

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात सिद्धार्थ पोतणीस (वय 46) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे. तक्रारदारांचा धनकवडीत फ्लॅट आहे. ते सोमवारी दुपारी काही कामानिमित्त कुलूप लावून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 33 हजार रुपायंचा ऐवज चोरून नेला.

ते मंगळवारी पहाटे परतले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले.

दुसरी घटना औंधमध्ये घडली असून, चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दिनेश खैरे (वय 55, रा. चेंबुर, मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. तक्ररादारांचा औंधमधील मेढीपार्क येथे फ्लॅट आहे.

ते फ्लॅटला कुलूप लावून गेल्यानंतर चोरट्यांनी फ्लॅट फोडला. (Pune Crime) कपाटात ठेवलेले सोन्या-चांदिचे दागिने असा एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

बी. टी. कवडे रस्त्यावर तिसरी घटना घडली असून, चोरट्यांनी बंद बंगला फोडून तब्बल 5 लाखांचा ऐवज पळविला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी 6 यावेळेत ही घरफोडी झाली आहे.

याप्रकरणी मोहित आग्रवाल (वय 25, रा. मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 28 जून रोजी ही घटना घडली आहे. तक्रारदार यांचा बी. टी. कवडे रोडवरील पाल्म ग्रुव्हस सोसायटीत बंगला आहे.

28 जून रोजी त्यांचा दिवसभर बंगला बंद होता. ही संधी साधत चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममध्ये घुसून लाकडी कपाटातून तब्बल 5 लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

चौथ्या घटनेत चोरट्यांनी लोणी काळभोर परिसरातील सोरतापवाडी भागातील बंद घरफोडून 6 लाखांचा ऐवजावर डल्ला मारला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत कल्पेश आढाव (वय 30, रा. सोरतापवाडी) यांनी तक्रार दिली आहे.

Pune : हडपसर अन् वानवडी परिसरातील अवैध धंद्यावर छापेमारी; 51 जण ताब्यात

तक्रारदारांचे सोमवारी रात्री घर बंद होते. ते काही कामानिमित्त घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी रात्रीत त्यांचे बंद घर फोडले. देवघरातील कपाटात ठेवलेली 3 लाख 10 हजार रुपयांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण 6 लाख 10 हजार रुपयांचा एवेज चोरीकरून पोबारा केला.

त्यानंतर चोरट्यांनी कोंढवा भागात तीन बंद फ्लॅट फोडले आहेत. तेथून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लांबविला आहे. भरदिवसा या घरफोड्या झाल्याने रहिवाशांत भितीचे वातावरण आहे.

याप्रकरणी रामेश्वर सावरगावी (वय 34) यांनी तक्रार दिली आहे. कोंढवा पोलिसांत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार 10 मे रोजी घडला आहे.

खडीमशीन चौक व येवलेवाडीतील सोसायटीत या घटना घडल्या आहेत. तक्ररादारांचे बंद घरफोडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून 1 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने चोरले. तर शेजारील रिजाय शेख यांचाही फ्लॅट फोडून 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दोन घरे फोडून चोरट्यांनी येवलेवाडीत आर. एस. डेव्हलपर्समधील एका महिलेचा बंद फ्लॅट फोडला. येथून 20 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.