Pune : हडपसर अन् वानवडी परिसरातील अवैध धंद्यावर छापेमारी; 51 जण ताब्यात

एमपीसी न्यूज : वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Pune) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचा बार उडवत अवैध धंद्यावर छापेमारी केली आहे. पहिल्या दिवशी या परिसरात डब्बल कारवाई झालेली असताना हडपसरमध्ये अवैध धंदे सुरूच होते.

याची कुणकुण लागताच पुन्हा दुसऱ्या दिवशी सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारीकरून 24 जणांवर कारवाई केली आहे. सलग कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अनुक्रमे वानवडी पोलीस ठाण्यात एक आणि हडपसर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे

गेल्या काही दिवसांपासुन हडपसर परिसरात अवैध धंद्दे खुलेआम सुरू असल्याची चर्चा आहे. अनेकवेळा कारवाई केल्यानंतरही ते सुरूच राहत असल्याचेही वास्तव आहे.

अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अवैध धंदे बंद करण्याबाबत सूचना दिल्यानंतर पुढचे दोन दिवस शांतता निर्माणकरून पुन्हा खेळ सुरूच होतो. यादरम्यान, गुन्हे शाखेकडून या अवैध प्रकारांवर कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान सोमवारी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोसावी वस्ती तसेच वानवडीतील सातवनगर येथे मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली.

या माहितीनुसार सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी केली. (Pune) छापेमारीत एकूण 27 जणांवर कारवाई करण्यात आली असून, दोन्ही ठिकाणांवरून एकूण 1 लाख 48 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

Pune : विद्युत ठेकेदारीचा परवाना देण्यासाठी लाच मागणाऱ्या दोन लिपिकांवर कारवाई

दरम्यान, सोमवारी कारवाई झाल्यानंतर देखील हडपसर भागात अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून आले आहे. सोमवारच्या कारवाईची चर्चा सुरू असतानाच सामाजिक सुरक्षा विभागालाच मंगळवारी देखील हडपसरमधील रेल्वे ट्रॅकजवळ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली.

लागलीच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी तब्बल 24 जण एकाच वेळी मटका जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.