Pune Crime News : पुणे महापालिकेत महिला अधिकाऱ्यास 50 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेत टेक्निकल ऍडव्हायझर म्हणून कामकाज पाहणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

आज सायंकाळच्या सुमारास पुणे महानगरपालिकेत ही कारवाई करण्यात आली. मंजुषा इधाते असे या लाचखोर महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. मंजुषा या 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार होत्या. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंजुषा इधाते या पुणे महानगरपालिकेत टेक्निकल ऍडव्हायझर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पुण्यातीलच एका बांधकाम व्यावसायिकाची टीडीआर प्रकरणाची केस आली होती. हे काम पूर्ण करून देण्यासाठी इधाते यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर लाचलुचपत विभागाने पुणे महापालिकेत सापळा रचला होता. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास 50 हजाराची लाच स्वीकारताना या महिलेला रंगेहात पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.