Pune Crime News : ऑनलाईन ॲपवरुन झालेल्या ओळखीतून तरुणीने केली तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज-ऑनलाईन ॲप वरुन झालेल्या ओळखीतून तरुणीने  (Pune Crime News) तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी 32 वर्षीय तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे. नवी मुंबईतील कळंबोळी येथील राहणाऱ्या तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सगळा प्रकार जून 2021 पासून सुरू होता.

Vadgaon Maval : माजी आमदार स्व. दिगंबरदादा भेगडे बालोद्यानाचे लोकार्पण

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तरुणी यांची ओळख “स्टार मेकर” या मोबाईल ॲप वरुन झाली होती. तरुणीने  फिर्यादीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या नंतर तिने फिर्यादीशी शरारिक संबंध प्रस्थापित करून त्यांची फसवणूक केली. या पुढे जाऊन तरुणीने या तरुणाला वेळोवेळी पैशांची रुपयांची मागणी केली. तसेच त्या तरुणाला तुझ्या घरी आणि ऑफिस मध्ये हे सगळं प्रकरण सांगून बदनामी करेल अशी धमकी देखील दिली. पैसे नाही दिले तर आत्महत्या करेन असे देखील वारंवार धमकावले. या नंतर फिर्यादी ने या जाचाला कंटाळून पोलिसात धाव घेतली.या प्रकरणी येरवडा ( Pune Crime News )पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.