Pune News : निवासी शाळा व वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : दौंड येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची (Pune News) निवासी शाळा व वसतिगृह सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवासी शाळा व वसतीगृहासाठी प्रत्येकी 10 हजार चौरस फुट अशी एकूण 20 हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या एकत्र अथवा वेगवेगळ्या खाजगी इमारतीची आवश्यकता आहे. या प्रत्येक इमारतींमध्ये प्रवेश क्षमतेनुसार 25 ते 30 खोल्या, 10 शौचालये, 10 स्नानगृहे, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय आदी सर्व पायाभूत सुविधा, तसेच इमारतीच्या भोवती संरक्षक भिंत असावी.

Pune Crime News : ऑनलाईन ॲपवरुन झालेल्या ओळखीतून तरुणीने केली तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक

दौंड परिसरातील इच्छुकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हेक्षण क्रमांक 104/105, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर (Pune News) समोर, येरवडा, पुणे-6 (दूरध्वनी 020-29706611) किंवा मुख्याध्यापिका, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा दौंड (8010615336) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.