Pune Crime News : बालेवाडी परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह तिच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज-पुण्याच्या बाणेर परिसरातील मिटकॉन कॉलेज जवळ चारित्र्याच्या (Pune Crime News) संशयावरून पतीने पत्नी आणि तिच्या सहकार्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. पत्नीच्या मानेवर आणि डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.

गणेश राजाराम डिंबळे (वय 37) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या 30 वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे.

Pune News : मुंबई-बंगळूर महामार्गावर रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. आरोपी फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दरम्यान सोमवारी आरोपी ती काम करत असलेल्या ठिकाणी गेला आणि त्याने पत्नी आणि तिच्या एका सहकाऱ्याला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनाही ठार मारण्याच्या (Pune Crime News) उद्देशाने लोखंडी हत्याराने पत्नीच्या मानेवर आणि डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. तर तिच्या सहकाऱ्यालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.