Pune Crime News : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेला ‘बब्बरसिंह’ जेरबंद, 10 लाखाचे चरस जप्त

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने परराज्यातून अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या एकाला जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून 10 लाख 10 हजार रुपये किमतीचे 1 किलो चरस जप्त करण्यात आले आहे. विकास बब्बरसिंह इटकान (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना खडकी बाजार येथील बस स्टँड समोरील सार्वजनिक रस्त्यावर संबंधित आरोपी संशयास्पदरीत्या सापडला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील बॅगची तपासणी केली असता आतमध्ये एक किलो चरस हा अमली पदार्थ सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून खडकी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

आरोपी हा मूळचा हरियाणातील हिस्सार येथील रहिवाशी आहेत. अमली पदार्थ विक्री करण्यासाठी तो पुण्यात आला होता. त्याच्याविरोधात एनडीपीएस एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.